
नवी दिल्ली : शाओमीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन एमआय५ यंदा वर्षअखेरपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता असून एमआय ५ स्मार्टफोन ३ डिसेंबरला एका कार्यक्रमामध्ये लॉन्च केला जाणार असल्याचा दावा चायनिज वेबसाईट ‘टिप्सटर लीक्सफ्लाय’ने केला आहे. त्यासोबतच, शाओमीच्या एमआयचा नेक्स व्हर्जन एमआय बँड १एस लॉन्च केला जाण्याची शक्यता असल्याचेही या वेबसाईटने म्हटले आहे.
मुहूर्तवेढ शाओमी एमआय५ च्या लॉन्चिंगची!
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर शाओमीच्या एमआय५ मध्ये असणार आहे. या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार २० नोव्हेंबरला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८२० चिपसेट लॉन्च करण्याची शक्यता आहे. क्वालकॉम काही दिवसांपासू हाय-एंड चिपसेटची टेस्टिंग करत होता.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात शाओमीने एमआय४ स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता त्याच स्मार्टफोनचा नवा व्हेरिएंट शोओमी बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ‘टिप्सटर लीक्सफ्लाय’सह अन्य वेबसाईट्सनीही दावा केला आहे की, एमआय५ हा ऑक्टोकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसरवर चालणारा पहिला स्मार्टफोन असेल. याआधी गूगल नेक्सस ६पी मध्ये ऑक्टोकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर दिला गेला होता.
