‘स्वच्छ भारत’चा खर्च जनतेच्या माथी

swachha-bharat
नवी दिल्ली: देशभरात दिवाळीनंतर सेवा करांवर अर्धा टक्का स्वच्छ भारत सेस लागू होणार असून सेवा करामध्ये ०.५% स्वच्छ भारत सेस १५ नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याने आता एकूण सेवा कर १४.५% होणार असल्याने नागरिकांना अधिक कर द्यावा लागणार आहे.

केंद्र सरकारने पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत भारत अभियानासाठी फंड जमविण्याचा मार्ग तयार केला असून मोदी सरकारने मिशनच्या फंडिंगसाठी सेस लावण्याची घोषणा केली आहे. नव्या आदेशाप्रमाणे १५नोव्हेंबरपासून सेवा करांवर ०.५% स्वच्छ भारत सेस लागू होणार आहे. या मिळणाऱ्या करामधून सरकार आपले स्वच्छ भारत अभियान राबविणार आहे.

Leave a Comment