‘मोटो जी ३’वर १ हजार रुपयांची सूट

moto-g3
मुंबई : दिवाळीनिमित्त फ्लिपकार्टने खास सेल सुरु केला असून या सेलमध्ये मोटोरोलाचा लेटेस्ट स्मार्टफोन ‘मोटो जी ३’वर तब्बल १ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. ही ऑफर फ्लिपकार्टने आपले अॅप वापरणाऱ्यांसाठी दिली आहे. आपण ही खरेदी अॅपच्या माध्यमातूनच करू शकता. हा सेल ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबरदरम्यान सुरु असणार आहे.

सध्या मोटो जी ३ स्मार्टफोनची बाजारातील किंमत १२ हजार ९९९ रुपये एवढी असून या फोनची फ्लिपकार्टच्या अॅपवरुन खरेदी केल्यास ११ हजार ९९९ रुपयांना हा स्मार्टफोन ग्राहकांना मिळेल. शिवाय, फ्लिपकार्टने एसबीआय कार्डद्वारे खरेदी करणाऱ्यांसाठी आणखी १० टक्के सूट जाहीर केल्यामुळे ‘मोटो जी ३’ ग्राहकांना १० हजार ८०० रुपयांना मिळणार आहे.

यासोबत फ्लिपकार्ट हॅप्पी दिवाळी सेलमध्ये लेनोव्हो पी१, आसूस झेनफोन २ लेसर ५.५ (२जीबी), सॅमसंग गॅलक्सी, ऑनर होली, एमआय ४आय, मोटो एक्स प्ले या स्मार्टफोन्सवरही डिस्काऊंट्स आणि एक्स्चेंज ऑफर्स देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर होम अप्लायन्स, लॅपटॉप्स, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादींवरही ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment