किर्लोस्कर व्हीडिओकॉन डीटूएचच्या संचालक मंडळावर

geetanjali-kirloskar
मुंबई : गीतांजली किर्लोस्कर यांच्या नावाला भारतातील अग्रगण्य डीटीएच सेवा असलेल्या व्हीडीओकॉन डीटूएच लिमिटेड कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदावर नेमणुकीस भागधारकांनी मान्यता दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत ही निवड करण्यात येते.

गीतांजली किर्लोस्कर या एक यशस्वी उद्योजक असून, साकरा वर्ल्ड हॉस्पिटलच्या अध्यक्ष आहेत. याबरोबरच किर्लोस्कर सिस्टम लि.च्या संचालक आणि व्यापारी असोसिएशनच्या विविध समितीवरही त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री (पिक्की) चा समावेश आहे. याशिवाय त्या प्रोफेशनल जाहिरातीतही आघाडीवर असून, त्यांची प्रतिभा अ‍ॅडव्हरटायजिंग नावाची अ‍ॅड एजन्सी आहे.