आता सीमविना कॉल शक्य

text-me-app
मुंबई : आपल्याला कोणाशी तरी मोबाईलवरून संवाद साधायचा असेल, तर सीमकार्डविना शक्य नाही, हे सर्वश्रुत आहे. परंतु आता सीमकार्डविना संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यातही एखाद्याशी संवाद साधायचा आहे, परंतु नंबरच कळू द्यायचा नसेल, तर तशीही सुविधा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. परंतु त्यासाठी मोबाईलवर एक अ‍ॅप डाऊनलोड करावा लागणार आहे. त्याचे नाव आहे, टेक्स्ट मी अ‍ॅप. हे डाऊनलोड केल्यास या सुविधा मिळणे शक्य आहे.

आपल्या मोबाईलवर टेक्स्ट मी अ‍ॅप डाऊनलोड केल्यास तुम्हाला या अकाऊंटवरून बरेच मोबाईल क्रमांक मिळू शकतात. त्यामुळे आपण आपला मोबाईल नंबर न देता अकाऊंडवर उपलब्ध क्रमांकावरून हवे त्याला फोन करू शकतो. जेव्हा आपण कॉल कराल. तेव्हा रिसिव्हरला आपला खरा मोबाईल क्रमांक दिसणारच नाही, तर त्यातून टेक्स्ट मी अ‍ॅपच्या माध्यमातून वापरलेला मोबाईल क्रमांक दिसेल. अर्थात, हा क्रमांक युरोप किंवा अमेरिकेतून आलेला दिसेल. कारण कॉलिंगच्या वेळी या देशांचा कोड रिसिव्हरच्या मोबाईलवर फ्लॅश होईल. एवढेच नव्हे, तर जर आपण अ‍ॅपवर उपलब्ध कोणत्या क्रमांकाचा वापर बंद केला, तर तो डिलिटही करता येणार आहे. त्यातही जर आपल्याकडे एखादा मोबाईल क्रमांक असेल आणि आपल्याला दुसरा हवा असेल, तर स्वतंत्र सीमकार्ड घेण्याची गरज नाही. फक्त एक अ‍ॅप डाऊनलोड करा आणि स्वतंत्र मोबाईल क्रमांक मॅनेज करता येणे शक्य आहे.

टेक्स्ट मी अ‍ॅपच्या माध्यमातून एक नंबर फ्री वापरू शकता. आपल्याला जेवढे कॉल किंवा एसएमएस करायचे आहेत, तेवढे या क्रमांकावरून करू शकता. परंतु ही अ‍ॅप सेवा सुरू करण्यासाठी काही अ‍ॅडस् पाहाव्या लागतील. एवढेच नव्हे, तर जर आपल्याला एकापेक्षा अधिक मोबाईल क्रमांक हवे असतील, तर दरमहा ६० रुपये द्यावे लागतील. गुगल प्ले स्टोअरवर टेक्स्ट मी अँड्रॉईडसाठी ही सेवा मोफत उपलब्ध आहे, असे सूत्रांनी सांगितले.