धुमकेतूत प्रथमच आढळले साखर व इथाईल अल्कोहोलचे कण

comet
विश्वाची उत्पत्ती कशी झाली असावी यावर आणखीनच वेगळा प्रकाश टाकू शकेल अशी बाब संशोधकांना सापडली आहे. सौरमंडळातील सर्वात जुने सदस्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या धुमकेतूत संशोधकांना प्रथमच साखर आणि इथाईल अल्कोहोलचे रेणू आढळले आहेत. लव्हजॉय नावाच्या धुमकेतूत हे सेंद्रीय कण सापडले असून ज्या खडकांपासून ग्रहांची निर्मिती झाली आहे, त्याच खडकाचा हे कण भाग आहेत.

यापूर्वीही धुमकेतूमध्ये संशोधकांना अनेक प्रकारचे सेंद्रीय पदार्थकण आढळले आहेत त्याचे ताजे उदाहरण म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सीला कॉमेट ६७ पी मध्ये आढळलेले कण. त्यात चार रेणू असे आहेत की जे यापूर्वी कधीच सापडलेले नाहीत.सौरमंडळाचे धुमकेतू हे सर्वात जुने सदस्य असल्याने त्यांना टाईम कॅप्सुल किंवा कालकुपी म्हणून संबोधले जाते. कारण त्यामुळे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी जीवन कसे अस्तित्वात आले असावे त्या कालखंडात डोकावून पाहता येते.

Leave a Comment