आईनस्टाईनवर केली क्वांटम थिएरीने मात

quantum
नेदरलँड: एकमेकांपासून कितीही दूरवर असणारे घटक एकमेकांवर परिणाम करू शकतात हे निर्विवाद सिद्ध करणारे संशोधन यशस्वीरीत्या पार पडल्याचा दावा डेल्ट तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. त्यामुळे भारतीय परंपरेतील ज्योतिषासारख्या संकल्पनांना बळ मिळण्याची शक्यता आहे.

सध्याच्या भौतिकशास्त्राच्या मान्यतेनुसार एकमेकांशी निगडीत असलेले अणू अथवा त्याहूनही सूक्ष्म असलेले इलेक्ट्रॉनसारखे घटक एकमेकांवर परिणाम करू शकतात. त्यांना एकमेकांपासून दूर केल्यानंतर त्यांच्यात संपर्क रहात नाही आणि ते एकमेकांवर प्रभाव टाकू शकत नाहीत.

वास्तविक ‘क्वांटम थिएरी’च्या माध्यमातून या सिद्धांताला आव्हान देण्यास सुरुवात झाली होती. मात्र दूरवरच्या अंतरावरून घटक एकमेकांवर परिणाम करू शकतात; हे निर्विवाद सिद्ध करण्यात यश आलेले नाही. आईनस्टाईनसारख्या युगप्रवर्तक शास्त्रज्ञानेही या शक्यतेला कसून विरोध केला होता. असले भाकड सिद्धांत मांडून देव आणि भुताटकीसारख्या भोंगळ कल्पनांना वाव देऊ नका; असा त्यांचा आग्रह होता.

मात्र ७० च्या दशकाच्या शेवटी सुरू केलेल्या प्रयोगांती निर्विवादपणे दूरवरचे घटक एकमेकांवर परिणाम करू शकतात; हे सिद्ध करण्यात पाल्याला यश आल्याचा दावा प्रमुख संशोधक रोनाल्ड हॅन्सन यांनी केला आहे.

या संशोधनांतर्गत करण्यात आलेल्या अंतिम प्रयोगात एकमेकांपासून तब्बल १ किलोमीटर ३० मीटर अंतरावर ठेवलेल्या दोन हिऱ्यांच्या एकेका इलेक्ट्रॉन्सनी एकमेकांशी संपर्क प्रस्थापित केल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.