यू ट्यूबला पैसे भरून पहा जाहिरातविरहीत व्हिडीओ

youtube
लॉस एंजेलिस: यू ट्यूबवरील व्हिडीओ पाहताना येणारा जाहिरातींचा अडथळा आता प्रेक्षकांना टाळता येणार आहे. फक्त त्यासाठी थोडेसे पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र सध्या तरी ही सेवा केवळ अमेरिकेतील नेटकरांनाच उपलब्ध आहे.

जाहिरातीशिवाय व्हिडीओ पाहण्यासाठी यू ट्यूबने ‘रेड’ही नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेसाठी दरमहा १० डॉलर्स शुल्क आकारले जाणार आहे. या उत्पन्नाचा काही हिस्सा व्हिडीओच्या निर्मात्यांनाही देण्यात येणार आहे. ‘गूगल प्ले म्युझिक’ सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांनाही ही सुविधा वापरता येणार आहे.

‘रेड’द्वारे व्हीडीओ डाउनलोड करता येतील; तसेच मोबाईलवर इतर अॅप वापरत असतानाच संगीत ऐकता येणार आहे.

Leave a Comment