मोटोरोलाच्या ड्राॅईड टर्बो टू चे फिचर्स लिक

droid
भारतात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलेल्या मोटोरोलाने त्यांचे दोन नवे स्मार्टफोन २७ आक्टोबरच्या इव्हेंटमध्ये लाँच केले जात असल्याचे जाहीर केले आहे. हे फोन ग्लोबली लाँच होणार असले तरी ते भारतीय बाजारात मिळणार वा नाही याचा खुलासा मात्र केला गेलेला नाही. या इव्हेंटची निमंत्रणे पाठवायला सुरवात झाली आहे.

ड्राॅइड टर्बो टू व मॅक्स टू या नावाने हे फोन बाजारात येतील असे समजते. पैकी टर्बो टूचे फिचर्स लिक झाले आहेत. हा फोन मोटो एक्स फोर्स नावाने विक्रीसाठी येणार असल्याचेही सांगितले जात आहे. या फोनसाठी ५,४ इंची शॅटरप्रूफ क्यूएचडी डिस्प्ले, अँड्राईड ५.१ लॉलिपॉप, ३२ अथवा ६४ जीबी इंटरनल मेमरी, ३ जीबी रॅम, २१ एमपीचा रिअर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह ३७६० एममएच ची बॅटरी दिली गेली असल्याचे समजते. त्याची अंदाजे किंमत ३९०८७ ते ४५५९१ रूपयांदरम्यान असेल असेही सांगितले जात आहे. मॅकस टूसाठी किंमत २६०५२ ते ३२५६५ रूपये अशा असतील.

Leave a Comment