फेसबुक देणार सायबर हल्ल्याची पूर्वसूचना

facebook
सॅन फ्रॅन्सिस्को- आता फेसबुकही गुगलच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या युजर्सना सायबर हल्ल्याची पूर्वसूचना देणार आहे. याबाबतची माहिती फेसबुकचे मुख्य सुरक्षा अधिकारी अॅलेक्स स्टॉमस यांनी दिली असून या सेवेला आ़जपासून सुरवात होणार आहे.

फेसबुकची सुरक्षा यंत्रणा सायबर हल्ला होत असल्याचे लक्षात येताच आपल्या युजर्सना याबाबतची सुचना देणार आहे. या प्रकारचे सायबर हल्ले हे अधिक आधुनिक पध्दतीने होत असल्याने फेसबुक आपल्या वापरकर्त्यांना याबाबत जागरूक करत आहे. नागरिकांनी आपल्या ऑनलाइन माहिती विषयी अधिक जागरूक असावे यासाठीही ही काळजी घेण्यात येत आहे. फेसबुक असा हल्ला झाल्यास त्याविषयीची माहिती एसएमएस अथवा मेलद्वारे मुळ वापरकर्त्यापर्यत पोहचविणार असून त्यासोबत लिंक आणि कोडही देणार आहे.