४जी स्मार्टफोन अवघ्या ६ हजार रुपयांत !

mobile
मुंबई : इनफोकसन या मोबाईल कंपनीने ‘एम ३७०’ हँडसेट लॉन्च केला असून या हँडसेटची ५ हजार ९९९ रुपये इतकी किंमत आहे. हा स्मार्टफोन ४जी स्मार्टफोन असूनही अधिकाधिक फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे. या स्मार्टफोनची विक्री ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट स्नॅपडीलवर सुरु झाली आहे.

लेटेस्ट अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉप ओएसवर एम ३७० स्मार्टफोन काम करतो. यामध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले स्क्रीन असून १.१ गीगाहर्ट्झ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन क्वाडकोर प्रोसेसर, १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी या स्मार्टफोनमध्ये आहे. ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि तोही एलईडी फ्लॅशसह इनफोकसच्या या ४जी स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. २ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही या स्मार्टफोनला दिला आहे. इनफोकस एम ३७० हा स्मार्टफोन ४जी आणि ३जी कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. ड्युअल सीमसह ब्लूटूश ४.०, जीपीएस, एजीपीएस आणि ग्लोनास इत्यादी कनेक्टिव्हिटी फीचर्स यामध्ये आहेत. यासोबत अँबेंट लाईट सेन्सर, प्रोक्सिमिटी सेन्सर, एक्सेलेरोमीटर आणि ई-कंपाससारखेही फीचर्सही देण्यात आले आहेत.

Leave a Comment