जमिनीखाली वसलेले शहर कॉबरपेडी

coober
ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात एक छोटेसे शहर आहे. त्याचे नाव कॉबरपेडी. या ठिकाणी जाऊन दूरवर दृष्टी टाकली तर शहराचा मागमूसही दिसत नाही म्हणजे घरे नाहीत, दुकाने नाहीत, बाजार नाही, रेस्टॉरंटस नाहीत. पण थोडा आणखी प्रयत्न करून निरखून पाहिले तर येथे लोकवस्ती आहे आणि सुमारे ४ हजार नागरिक येथे राहतात असे दिसेल. हे दिसण्यासाठी थोडे जमिनीच्या खाली जावे लागते. कारण हे शहर पूर्णपणे जमिनीखालीच वसलेले आहे.

या भुयारी शहरात ८०० हून अधिक घरे आहेत आणि आश्चर्य वाटेल पण ही वसाहत १०० वर्षांहूनही अधिक जुनी आहे. या भागात खाणी खूप संख्येने आहेत आणि कुबरपेडी शहरात मु्ख्य वस्ती कामगार लोकांचीच आहे. येथली हवा गरम आणि असह्य आहे. त्यामुळे उकाड्यापासून सुटका मिळविण्यासाठी येथे जमिनीखाली घरे बांधली गेली आहेत. निकामी झालेल्या खाणी खोदूनच त्यांचा घरासारखा वापर केला गेला आहे. जमिनीखाली असल्याने येथे उन्हाळ्यातही एसीची गरज भासत नाही तसेच हिवाळ्यात हिटर लागत नाहीत. त्यामुळे वीज बचत होते ती वेगळीच.

या ४ हजार लोकवस्तीच्या भुयारी गावात घरे आहेत तसेच बाजार, हॉटेल्स, चर्च, खेळासाठी गोल्फ मैदान, म्युझियम, मनोरंजनासाठी पब अशा सर्व सुविधा आहेत.

Leave a Comment