
मुंबई: आपल्या बिग बिलियन डे सेलमध्ये ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टने सॅमसंग गॅलक्सी नोट ४ वर तब्बल सहा हजारांची घसघशीत सूट दिली असून याव्यतिरिक्त तुमचा जुना हँडसेट एक्सचेंज करुन त्यावर तब्बल १५,००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळवू शकता. त्यामुळे ३४,९९९ किंमत असलेला हा स्मार्टफोन आता रु. १९,९९९ किंमतीला उपलब्ध होणार आहे.
सॅमसंगच्या गॅलक्सी नोट ४वर १५ हजारांची सूट
आपल्याला एक्सचेंज ऑफरचा फायदा घेण्यासाठी आपल्या जुन्या फोनची माहिती द्यावी लागणार आहे. ज्यामध्ये आपल्याला आपल्या जुन्या मोबाइल कंपनीचे नाव, मॉडेल आणि आयएमईआय नंबर द्यावा लागणार आहे. तुमच्या जुन्या फोनची माहिती मिळताच, डिस्कांऊट ऑर्डर जोडण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा जुना फोन ऑर्डर डिलीव्हरीच्या वेळी द्यावा लागेल.
