आयफोनच्या ६एस, ६एस प्लसची भारतात विक्री सुरु

iphone
मुंबई: काल मध्यरात्री भारतात बहुचर्चित आयफोन ६ एस आणि आयफोन ६ एस प्लस हे दोन्ही स्मार्टफोन लाँच करण्यात आले. अॅपलचे हे दोनही मोबाईल फोन्स याआधीच इतर देशांमध्ये लाँच झाले आहेत.

कंपनीने ९ ऑक्टोबरला ४० देशांमध्ये हे फोन लाँच केले होते आणि पहिल्याच तीन दिवसांत या मोबाईल्सनी आतापर्यंतचे विक्रीचे सगळे रेकॉर्डस तोडले. यावेळी तब्बल १.३ कोटी मोबाईल्सची विक्री झाली होती. याआधी आयफोन ६ ची जवळपास १ कोटी युनिट्सची विक्री झाली होती.

अॅपलचे भारतातील चाहते या मोबाईल्सची उत्सुकतेने वाट पाहत असल्यामुळे अॅपल भारतातही विक्रीचे रेकॉर्ड बनवेल अशी कंपनीला आशा आहे. दोन्ही हँडसेटमध्ये ३डी टच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे आयफोनचा डिस्प्ले तीन प्रकारचे टच जाणू शकतो. टॅप म्हणजे हलकासा स्पर्श, प्रेस म्हणजे जोर लावून स्पर्श आणि डीपर प्रेस थोड्या वेळासाठी स्क्रीन धरुन केलेला स्पर्श.

१६ जीबी, ३२ जीबी आणि ६४ जीबी अशा तिन्ही वेरियंटमध्ये अॅपलचे हे दोन्ही फोन लाँच करण्यात आले आहेत. फोन वाकू नये म्हणून ७०००० सीरीज अॅल्युमिनियमचा वापर केला आहे.

Leave a Comment