अमेरिकेत आर्थिक तंगी

finanace
वॉशिंग्टन: अमेरिकन सरकार आर्थिक तंगीचा सामना करीत असून कॉंग्रेसने कर्ज मर्यादा न वाढविल्यास नियमित खर्चाची तोंडमिळवणी करणेही सरकारला मुश्कील होणार आहे; असा इशारा अमेरिकेचे अर्थमंत्री जेकब ल्यू यांनी दिला.

अमेरिकन सरकारला १८ हजार १०० अरब डॉलर्सची कर्ज मर्यादा आहे. रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या कॉंग्रेसने ही मर्यादा वाढवावी; अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यासाठी ल्यू यांनी कॉंग्रेसला पत्र दिले आहे. सध्याच्या परिस्थितीत दि. ३ नोव्हेंबर नंतर सरकारकडे केवळ ३ अरब डॉलर्सचा निधी शिल्लक राहणार आहे. या निधीत दैनंदिन खर्च भागविणेही अशक्य आहे; असे ल्यू यांनी पत्रात नमूद केले आहे.

सरकार वेतन आणि सामाजिक सुरक्षा, माजी सैनिकांना मिळणारे लाभ यावर मोठा निधी खर्च करते. मात्र कॉंग्रेसने पुढाकार घेऊन कर्जाची मर्यादा न वाढविल्यास अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच सरकार या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अपयशी ठरेल; अशी भीती ल्यू यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमेरिकन कॉंग्रेसने लवकरात लवकर कर्ज मर्यादा वाढवून सरकारला निधी उभारण्यास मुभा द्यावी; अशी विंनती त्यांनी केली आहे.

Leave a Comment