पॅन व्यवहार तपासण्यासाठी सरकारची नवी प्रभावी यंत्रणा

pan
नवी दिल्ली – सरकारने काळ्या पैशाचा प्रभावीपणे मागोवा, तसेच एखादी व्यक्ती किंवा कंपनीकडून देशभरात होत असलेल्या आर्थिक व्यवहारांचा शोध घेण्यासाठी अतिशय प्रभावी असे ‘पॅन ऍक्टिव्हिटी मॉनिटरिंग ऍण्ड ऍनेलिसिस सॉफ्टवेअर’ या नावाचे प्रभावी उपकरण विकसित केले असून, ते लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या यंत्रणेला ‘इन्कम टॅक्स बिझिनेस ऍप्लिकेशन-पर्मनंट अकाऊंट नंबर’ (आयटीबीए-पीएएन) असे नाव देण्यात आले असून आयकर खात्यातील तज्ज्ञांच्या पथकाकडून या उपकरणाची अंतिम चाचणी करण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीने किंवा कंपनीने देशभरात किती आणि कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार केले आहेत आणि हे व्यवहार करताना त्याने जिथे पॅन क्रमांकाचा वापर केला, त्या प्रत्येक व्यवहाराची माहिती या उपकरणामुळे आयकर अधिकार्‍यांना प्राप्त होऊ शकणार आहे, अशी माहिती अर्थमंत्रालयातील सूत्राने दिली.