स्वस्त होणार ओला कॅब

ola
बंगळुरू – आजपासून एका नवीन फीचरचा टॅक्सी अॅग्रीगेटर ओला कंपनीने शुभारंभ केला आहे. शेअर हे फीचर ओलाने लाँच केले आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमची कॅब शेअर करून पैसे वाचवू शकता.

बंगळुरूमध्ये हे कारपुलिंग फीचर प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये पाच शहरांमध्ये हे फीचर सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. केवळ पन्नास रुपयांमध्ये ही सेवा उपलब्ध होईल असे कंपनीने सांगितले आहे. तुम्ही तुमचे सहकारी, मित्र, ओळखीच्या लोकांसोबत ग्रुप्स तयार करू शकता आणि त्यांच्यासोबत कॅब शेअर करू शकता किंवा कुणासोबतही कॅब शेअर करू शकता असे कंपनीने म्हटले आहे. कारच्या आसन क्षमतेचा ३३ टक्केच वापर होत आहे असे आमच्या लक्षात आले त्यानंतर आम्ही ही योजना सुरू करण्याचा विचार केला असे कंपनीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment