
चीनी स्मार्टफोन कंपनी मेजूने त्यांचा फोर जी सपोर्ट करणारा मेजू दोन हा सर्वात स्वस्त पण पॉवरफुल स्मार्टफोन भारतीय बाजारात उपलब्ध करून दिला आहे. या फोनची किंमत ६९९९ रूपये असून तो पांढरा, निळा, गुलाबी आणि स्लेट कलर मध्ये उपलब्ध आहे.
मेजू एम २ भारतात दाखल
या फोनसाठी पॉलीकार्बोनेट बॉडी मॅग्नेशियम अॅलॉय फ्रेमसह दिली गेली आहे. अँड्राईड लॉलीपॉप ५.१ ओएसवर चालणार्या या फोनसाठी ५ इंची स्क्रीन एजीसी ड्रॅगनटेल प्रोटेक्टीव्ह ग्लाससह दिला गेला आहे. २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १३ एमपीचा रियर तर ५ एम.पीचा फ्रंट कॅमेरा, फोरजी, ब्ल्यू टूथ, वायफाय, जीपीएस, एजीपीएस अशी अनेक कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स या फोनसाठी दिली गेली आहेत.
