यंदा सणसमारंभात दणकून होणार खरेदी

shopping
यंदाच्या सणसमारंभांच्या काळात म्हणजे नवरात्रीपासून नाताळच्या काळात भारतात ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून ग्राहक ५२ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या वस्तू खरेदी करतील असा अंदाज असोचेमने व्यक्त केला आहे. संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार यदा ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या विक्रीत ४० ते ४५ टक्के वाढ नोंदविली जाईल.

ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी देऊ केलेल्या विविध ऑफर्स आणि सवलतींच्या जाळ्यात ग्राहक अलगद अडकतील आणि त्यांना या आकर्षणापासून दूर राहणे अवघड होईल असेही असोचेमने आपल्या अहवालात नमूद केले आहे. नवरात्री, दुर्गापूजा, दसरा, दिवाळी, नाताळ या सणांसाठी ही खरेदी होईल आणि त्यात मोबाईल, इलेक्ट्रोनिक्स, डिझायनर फर्निचर, कपडे, दागिने, पादत्राणे यांची खरेदी अधिक असेल असाही अंदाज वर्तविला गेला आहे. त्यामुळे देशात आर्थिक नरमीचे वातावरण असले तरी कंपन्यांच्या व्यवसायात मात्र वाढ होणार आहे.

गतवर्षी याच काळात देशात ३० हजार कोटींची खरेदी ऑनलाईन शॉपिंग साईटवरून केली गेली होती. असोचेमचे महासचिव डी.एस.रावत म्हणाले, देशात स्मार्टफोन, टॅब्लेट व अन्य मोबाईल उपकरणांचा वापर अधिक होऊ लागल्याने त्याचा थेट फायदा ई कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायवाढीला होत आहे.

Leave a Comment