
मुंबई: नवा विक्रम अॅपलच्या ६एस आणि ६ एस प्लसने विक्रीचा रचला असून तीन दिवसात आतापर्यंत १.३ कोटी मोबाईलची विक्री झाली असल्याचे अॅपलने स्पष्ट केले. तसेच १६ ऑक्टोबरला हे दोन्ही स्मार्टफोन भारतातही लाँच होणार आहे.
प्रतिक्षा संपली; १६ ऑक्टोबरला भारतात लाँच होणार आयफोन ६एस आणि ६ एस प्लस
याआधी विकेंडला आयफोन ६ची जवळजवळ १ कोटी मोबाईलची विक्री झाली होती. पहिल्या तीन दिवसांमध्ये आयफोन ६एस आणि आयफोन ६ एस प्लसची शानदाक विक्री झाली असून पहिल्या विकेंडमध्येच विक्रीचे सगळे विक्रम मोडित काढले असल्याचे अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी सांगितले. ४० देशांमध्ये ९ ऑक्टोबरला हे स्मार्टफोन लाँच करण्यात येणार असून तर १० ऑक्टोबरला ६ देशांमध्ये लाँच करण्यात येणार आहे. तसेच भारत, मलेशिया आणि तुर्कस्थानमध्ये १६ ऑक्टोबरला लाँच करण्यात येणार आहे.
