भारताचा अस्ट्रोसॅट अंतराळात झेपावण्यासाठी सज्ज

isro
भारताने खास अवकाश संशोधनासाठी विकसित केलेला अॅस्ट्रोसॅट हा उपग्रह यशस्वीपणे अवकाशात झेपावला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून हे प्रक्षेपण करण्यात आले. भारत हा अवकाशात वेधशाळा असणारा जगातील पाचवा; तर विकसनशील देशांमधील पहिला देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, युरोपिय संघ, रशिया आणि जपानने अंतराळ दुर्बीणी प्रक्षेपित केल्या आहेत.

या प्रकल्पाबाबत इस्त्रोचे अध्यक्ष किरण कुमार म्हणाले, या दुर्बीणीचा उपयोग ब्लॅक होलच्या अध्ययनासाठी होणार आहे. तसेच तारे, आकाशगंगा यांचे जन्म व मृत्यू यांच्या विश्लेषणासाठीही होणार आहे.ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान म्हणजे पीएसएलव्हीचे हे उड्डाण ऐतिहासिक म्हणावे लागेल कारण प्रथमच अमेरिकेचा उपग्रह भारतातून प्रक्षेपित केला गेला आहे. पीएसएलव्हीचे हे ३१ वे उड्डाण असून यापूर्वीची सर्व ३० उड्डाणे यशस्वी झाली आहेत. भारतीय उपग्रह अॅस्ट्रोसॅट पृथ्वीपासून ६५० किमी उंचावर स्थापित केला जाणार आहे. यात ६ अन्य देशांचे उपग्रहही अवकाशात सोडण्यात आले.

Leave a Comment