बीएमडब्ल्यूच्या महागड्या पण देखण्या मॅकसी स्कूटर्स भारतात

bmw-scooter
एलिगंट आणि हायक्लास कार व बाईकसाठी प्रसिद्ध असलेल्या जर्मन ऑटो कंपनी बीएमडब्ल्यूने त्यांच्या महागड्या आणि श्रीमंत व्यक्तींना नजरेसमोर ठेवून बनविल्या गेलेल्या मॅकसी स्कूटर्स आक्टोबरमध्ये भारतीय बाजारात आणल्या जात असल्याची घोषणा केली आहे. सी ६५० स्पोर्टस आणि सी ६५० जीटी अशी त्यांची नांवे आहेत.या स्कूटर्स एलिट क्लासच्या सर्व गरजा पूर्ण करतील अशा प्रकारे डिझाईन केल्या गेल्या आहेत.

सी ६५० जीटी साठी नवीन रियर लाईट युनिट दिले गेले आहे तर सी ६५० स्पोर्टस डिझाईनमध्ये इंन्स्ट्रूमेंट डायल व हँडलबार अधिक ट्रीम केले गेले आहेत. या स्कूटर्स ३ रंगात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दोन्ही मॉडेल्ससाठी ६४७ सीसी चे दोन सिलींडर इंजिन दिले गेले आहे. यामुळे प्रदूषण कमी होते व पर्यायाने पर्यावरणाची हानीही कमी होते. दोन्ही गाड्यांसाठी उच्च दर्जाची आरामदायी सुरक्षा दिली गेली आहे. सस्पेन्शन उत्तम आहे व त्यामुळे गाडी चालविताना सुरक्षा मिळते. ब्रेकींग सिस्टीमही अतिशय उत्तम आहे त्यामुळे सुरक्षेबरोबरच चांगले अॅक्सिलरेशनही चालकाला मिळते. ऑटोमॅटिक डेटाईम रायडिंग लाईटसह असलेल्या या स्कूटर्स रोजचा वापर तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही अतिशय आदर्श असल्याचा कंपनीचा दावा आहे. या मॉडेल्सच्या किंमती ६ लाखांपासून सुरू होत आहेत.

Leave a Comment