
नवी दिल्ली: भारतातील मोबाईल वॉलेटची वाढती मागणी पाहता देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकने आज आपले एसबीआय बडी हे मोबाईल वॉलेट अॅप लॉन्च केले असून मोबाईल वॉलेटच्या जगात मोठे नाव असणाऱ्या पेटीएमला आता एसबीआय आवाहन देणार आहे.
पेटीएमला टक्कर देण्यासाठी एसबीआयने आणले मोबाईल वॉलेट
देशात एसबीआयच्या खातेधारकांची संख्या सर्वाधिक असून हे मोबाईल वॉलेट एसबीआयच्या ग्राहकांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. भारतीय स्टेट बँक मोबाईल वॉलेट लॉन्च करणारी पहिली बँक नसून यापूर्वी एचडीएफसीने पेजॅप आणि आयसीआयसीआयने पॉकेट नावाने आपले मोबाईल वॉलेट लॉन्च केले आहे. पण यासर्वांना एसबीआयचे मोबाईल वॉलेट अपवाद ठरणार आहे. हे मोबाईल फक्त एसबीआयच्या ग्राहकांसाठी नसून इतर सर्व बँकेच्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सध्या स्टेट बँकने हे वॉलेट फक्त अँड्रॉईड यूजर्ससाठी लॉन्च केले आहे.
