
कोरियन इलेक्ट्रोनिक कंपनी एलजीने त्यांचा नवा स्मार्टफोन जेंटल फ्लिप नावाने बाजारात सादर केला असून दक्षिण कोरियात तो ११ हजार रूपयांत उपलब्ध करून दिला गेला आहे.
एलजीचा जेंटल फ्लिप स्मार्टफोन सादर
या फोनसाठी ३.२ इंची सिंगल एलसीडी टच स्क्रीन, अॅड्राईड लॉलीपॉप ५.१ ओएस, १ जीबी रॅम, ४ जीबी इंटरनल मेमरी. मायक्रो एसडी स्लॉट, ३ एमपीचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. कनेक्टीव्हीटीसाठी वायफाय, ब्ल्यू टूथ, मायक्रो यूएसबी, थ्रीजी ऑप्शन आहेत. नेव्ही ब्ल्यू आणि बुरगंडी कलर मध्ये तो उपलब्ध आहे.
