ब्लॅकबेरी मेसेंजरवर पाकमध्ये डिसेंबरपासून बंदी

balckberry
पाकिस्तान सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॅकबेरी लिमिटेडच्या मेसेंजिंग सेवेवर १ डिसेंबरपासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भातल्या सूचना व आदेश पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अॅथॉरिटीने स्थानिक मोबाईल ऑपरेटर्सना दिले असल्याचेही समजते.

पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश आहे त्याचबरोबर सध्या तेथे अनेक धोकादायक दहशतवादी संघटना, गुन्हेगारी टोळ्या आणि अमली पदार्थ स्मगलर्स कार्यरत आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयनेही त्यांची दहशतवादी फोनवरून संभाषण करत असताना ते ट्रॅक करण्याची क्षमता वाढविण्यास सुरवात केली आहे. मात्र ब्लॅकबेरी मेसेंजरमध्ये ईमेल केली तर ती कोडवर्ड मध्ये बदलली जाते. तसेच युजर फोन आणि सावर्जनिक नेटवर्कमध्येही ब्लॅकबेरी मेसेंजर संदेश कोडमध्ये बदलतात. ही युजरसाठी मोठीच सोय असली तरी कांही अपराधी घटना घडल्या तर पोलिस अथवा गुप्तचरनाही ही कोड भाषा उलगडणे अवघड जाते आणि त्यामुळे गुन्हेगार शोधण्यातही अनंत अडचणी येतात. यामुळे ही सेवाच बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

Leave a Comment