सेबीकडून सहारा म्युचुअल फंड नोंदणी व परवाना रद्द

sebi
सिक्युरिटीज अॅन्ड एक्स्चेंज बोर्ड म्हणजे सेबीने मंगळवारी सहारा म्युच्युअल फंडचा परवाना व नोंदणी रद्द केली असून ही कंपनी व्यवसाय करण्यास सक्षम व योग्य नसल्याचे कारण दिले आहे. त्याचबरोबर या कंपनीने त्यांच्या कार्यभार अन्य फंड हाऊसकडे सोपवावा असेही आदेश दिले असून त्यासाठी पाच महिन्यांची मुदत दिली गेली आहे. या काळात हे काम पूर्ण न झाल्यास युनिट धारकांची युनिट रिडिम करून त्यांचे पैसे ३० दिवसांत परत करण्याविषयीही कंपनीला बजावले गेले आहे. कंपनीने सध्या नवीन गुंतवणकदारांकडून तसेच अगोदरपासूनच्या युनिटधारकांकडूनही नव्याने कोणतीही गुंतवणूक घेऊ नये असेही आदेश दिले गेले आहेत

सेबीबरोबर सहारा समूह दीर्घकाळ नियम व कायदा लढाई लढत असून त्याची सुरवात सहाराच्या दोन ग्रुपनी २४ हजार कोटी गुंतवणूकदारांना परत करण्याचे आदेश दिल्यापासून ही लढाई सुरू आहे. सेबीने नुकतेच सहारा फर्मचे पोर्टफोलियो मॅनेजमेंट लायसन्सही रद्द केले आहे.

Leave a Comment