
मायक्रोसॉफ्ट कार्पोला या तिमाहीत तब्बल २०० अब्ज रूपयांचे नुकसान झाले असून आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. मायक्रोसॉफटने नुकतीच ७८०० कामगारांची कपात करण्यात येणार असल्याची घोषणाही केली आहे.
मायक्रोसॉफ्टला तिमाहीत २०० अब्ज रूपये तोटा
मिळालेल्या माहितीनुसार मायक्रोसॉफटने नोकियाची खरेदी करताना प्रत्यक्ष किमतीपेक्षा अधिक लावलेली किंमत आणि विंडोज ओएसची घटती मागणी यामुळे हे नुकसान झाले आहे.गतवर्षी कंपनीने नोकिया हँडसेट युनिटची खरेदी केल्यानंतर ५०० अब्ज रिस्ट्रक्चरिंगसाठी खर्च केले आहेत. मायक्रोसॉफटच्या शेअरमध्येही ४ टक्के घसरण झाली आहे. विंडोजची मागणी कमी झाली असून या वर्षी पहिल्या तिमाहीत ही मागणी २१ टक्के घटली आहे आणि ३० जूनला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या शेअरमध्ये प्रतिशेअर ४० टक्के लॉस झाला आहे.
या सार्या परिस्थितीचा आढावा घेऊन मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी कंपनीने सॉफटवेअर व क्लाऊड सेवेवर अधिक लक्ष केंद्रीत केले असल्याचे जाहीर केले आहे. १ वर्षापूर्वीच मायक्रोसॉफ्टचा शुद्ध नफा ५५ टक्के म्हणजे ३०० अब्ज रूपये इतका होतो.
