ट्रेन रद्द झाल्यास पूर्ण पैसे जमा होणार तुमच्या अकाउंटमध्ये

railway
नवी दिल्ली- ऑनलाइन बुकिंगचा आणखी एक फायदा मिळणार असून जर अचानकपणे तुमची रेल्वे रद्द झाल्यास तिकिटाचे संपूर्ण पैसे परत मिळतील तेही थेट तुमच्या अकाउंटमध्ये अशी घोषणा रेल्वेने केली आहे. रेल्वे रद्द झाल्यास आधीही तिकिटाचे पैसे परत मिळत होते परंतु त्यासाठी बरेच कागदी घोडे नाचवावे लागत असे. आधी अर्ज करा मग तिकीट जमा करा यामुळे बरेच जण ट्रेन रद्द झाल्यानंतर पैसे परत मागत नव्हते. त्यावर रेल्वेने तोडगा काढत ही नवी योजना आणली आहे.

Leave a Comment