पावसाचे पाणी शिरले उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिर गाभाऱ्यात

mahakaleshwar
उज्जैन – मध्यप्रदेशमध्ये सुरु जोरदार पावसामुळे १२ ज्योर्तिलिंगापैकी एक असणारे महाकालेश्वरही त्रस्त झाले असून उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात पावसाचे पाणी शिरले आहे. मंदिराच्या आतील कोटी कुंड तीर्थमधून पाणी मंदिराच्या गाभाऱ्यात पसरले आहे.

मंदीर पाण्याने भरले असल्याने पहिल्यांदाच महाकालचा भस्म आरती पाण्यात उभे राहून करावी लागत आहे. दरम्यान मोटर लावून मंदिराच्या गाभाऱ्यातील पाणी बाहेर काढले जात आहे. मिलालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्रीच्या शयन आरतीनंतर मंदिराच्या गाभाऱ्याचे दार बंद करण्यात आले होते. जेंव्हा सकाळी दरवाजा खूला केला तेव्हा आत पाणी भरले होते.