एचडीएफसी ३० मिनिटांत देणार ऑटो लोन

hdfc
खासगी क्षेत्रातील भारताची दोन नंबरची मोठी बँक एचडीएफसीने सोमवारी केवळ ३० मिनिटांत ऑटो लोन देण्याची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ग्राहकाना चारचाकींसाठी ३० मिनिटांत तर दुचाकींसाठी केवळ १५ मिनिटात कर्ज दिले जाणार आहे. ही योजना सर्व ग्राहकांसाठी खुली असून कर्ज घेताना ग्राहकाला आधारकार्ड नंबर व फिंगरप्रिंट असे बायोमेट्रीक डिटेल्स द्यावे लागणार आहेत.

हे कर्ज घेताना कमीतकमी कागदपत्रे कर्जदाराला सादर करावी लागतील यावर भर दिला गेला आहे असे बँकेचे सिनियर उपाध्यक्ष व बिझिनेस हेड अशोक खन्ना यांनी सांगितले. ते म्हणाले इच्छुक कर्जदार कुठल्याही ऑटो डिलरशीपकडे अथवा बॅकंच्या अन्य कर्जसुविधा केंद्रात त्यासाठी संपर्क साधू शकतो.