आणखी पाव टक्क्याने व्याज दर घसरणार

interest
नवी दिल्ली : येत्या काही दिवसांमध्ये पावसाने नियमित हजेरी लावल्यास आगामी पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेतर्फे प्रमाण व्याजदरांमध्ये आणखी पाव टक्क्याची घट करण्यात येईल, असा अंदाज बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने वर्तविला. आगामी पतधोरण ४ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे.

पावसाने दगाफटका केला नाही, तर चार ऑगस्टला जाहीर होणा-या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन प्रमाण व्याजदारांमध्ये पाव टक्क्याची घट करण्याची दाट शक्यता आहे,

अशी माहिती बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचचे मुख्य आर्थिक विशेषज्ञ इंद्रनील गुप्ता यांनी दिली. देशातील महागाई नियंत्रणात असून, जून २०१५ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) ५.२ टक्क्यावर होता.

Leave a Comment