अमरनाथ भाविकांच्या सुरक्षेसाठी १६ पोलिस कंपन्या

amarnath
जम्मू काश्मीरमध्ये दक्षिण काश्मीर भागातील पवित्र अमरनाथ गुहा भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून लवकरच सुरू होत असलेल्या या यात्रेसाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी १६ पोलिस कंपन्या तैनात करण्यात आल्याचे जम्मू कठुआ रेंजचे पोलिस उपमहानिरिक्षक अश्कूर वानी यांनी सांगितले. यात्रेकरूंच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी या कंपन्यांवर दिली गेली आहे. २४ तास ही सुरक्षा दिली जाणार आहे. बेस शिबिरातही पोलिस नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

लंगर आणि भाविकांच्या वाहनांसाठीही सुरक्षेचा इंतजाम करण्यात आला आहे. मार्गावरील बर्फ हटविण्याच्या कामाला वेग आला असून यात्रा सुरू होण्यापूर्वी हा मार्ग यात्रेकरूंसाठी मोकळा केला जाणार आहे. अमरनाथ गुहेजवळ २१६ टॉयलेट, ३० बाथरूम्स, ११ हटस्, ५०० तंबू व ८० दुकाने उभारली गेली असल्याचेही समजते.यात्रेकरूंनी स्वास्थ प्रमाणपत्र घेण्यासाठी जम्मूत चार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

Leave a Comment