
मुंबई – सामान्य गुंतवणूकदारांच्या जनजागृतीसाठी व कॅपिटल मार्केटमधील सुप्रशासनाला प्रोत्साहित करण्यासाठी इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) च्या वतीने‘कॅपिटल मार्केट’ या विषयावर जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आयसीएसआय दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन करते. “कॅपिटल मार्केट – द इंजिन फॉर इकॉनॉमिक ग्रोथ”या संकल्पनेवर आधारित सप्ताहामध्ये विविध गोष्टींवर चर्चा करण्यात आली. या सप्ताहाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते.
आयसीएसआय आयोजित कॅपिटल मार्केट सप्ताह साजरा
कॅपिटल मार्केटमधील कंपनी सेक्रटरीचा भुमिका स्पष्ट करताना आयसीएसआयचे अध्यक्ष सीएस अतुल एच मेहता म्हणाले, की वर्षानुवर्षेस्वतःला व्यावसायिक म्हणून विकसित केले आहे. ज्यामध्ये त्यांची प्रमुख भुमिका म्हणून कम्पालयन्स आणि कार्पोरेट गव्हर्रन्स यावर ते काम करत आहेत. पण काळानुरुप आता कंपनी सेक्रेटरी हे प्रशासकीय व्यावसायिक व कंपनी बोर्डाचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. ते आता पुर्णतः प्रशासनाचे व्यावसायिक तर काही वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्पोरेट बोर्डाने घेतलेल्या वेगवेगळ्या भुमिकांचे तेमुक्त सल्लागार म्हणून ओळखले जाऊ लागलेत. सिक्युरिटीज करार (नियमन) अधिनियम, १९५६, डिपॉजिटरीजमधील कायदा १९९६, सेबी कायदा, १९९२ आणि इक्विटी, डेट सूची, आयडीआएस या कराराअंर्तगत कंपनी सेक्रेटरी हे फक्त सत्यप्रती तपासणी आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठीच त्यांचे काम आहे असे ओळखू लागले आहेत.
ते याबाबत आधिक माहिती देताना म्हणाले, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने भारतीय कंपनी सेक्रेटरीला संचालक (एस-१) आणि जनरल सभा (एस-२) मंडळांच्या बैठकांवर अधिकृतरित्या मान्यता देण्याची परवानगी आयसीएसआयला मिळाली आहे. कलम ११८(१०)२०१३ कंपनी कायद्यानुसार, भारतीय कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाकडून सामान्य बोर्डच्या सभांनी घेतलेल्या घोषणापत्रांचे पालन करावे व त्या निर्णयांची आंमलबजावणी सर्व कंपन्याना बंधनकारक राहिल, असेही त्यांनी सांगितले.
