तात्काळ तिकिट योजनेत सुधारणा

railway
नवी दिल्ली – १५ जूनपासून रेल्वेच्या वातानुकूलित आणि बिगैर वातानुकूलित तत्काळ तिकिट आरक्षणाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. तत्काळ तिकिट योजनेअंतर्गत सध्या रेल्वेच्या विहित वेळापत्रकाच्या एक दिवस आधी एकाच वेळी हे आरक्षण सुरू होते. १५ जूनपासून तात्काळ योजनेअंतर्गत रेल्वेच्या वेळापत्रकाच्या एक दिवस आधी वातानुकूलित श्रेणीच्या तिकिटांचे आरक्षण सकाळी १० वाजल्यापासून आणि बिगर वातानुकूलित श्रेणीच्या तिकिटांचे आरक्षण ११ वाजल्यापासून सुरू होईल.

याव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या तिकिट एजंटना (वायटीएसके, आरटीसएम, आयआरटीसी एजंट आदी) आता सर्वसाधारण तिकिटांच्या आरक्षणाच्या आधी अर्धा तास सकाळी ८.०० ते ८.३० पर्यंत आणि वातानुकूलित श्रेणीच्या तात्काळ आरक्षणाच्या सकाळी १०.०० ते १०.३० पर्यंत तसेच बिगर वातानुकूलित श्रेणीच्या तात्काळ आरक्षणाच्या सकाळी ११.०० ते ११.३० वा. पर्यंत तिकिट आरक्षण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Comment