तरंगते शहर सेवोंलिना

castle
जगातील सर्वात मोठी लेक सिस्टीम असलेले शहर म्हणून फिनलंडमधील सेवोंलिना शहर ओळखले जाते. ३७६ वर्षांचा इतिहास असलेली ही फ्लोटिंग सिटी येथील सेवोनिया कॅसल म्हणजे महालाबद्दल खूपच प्रसिद्ध आहे आणि जगभरातून पर्यटक या नगरीचे सौंदर्य पाहण्यासाठी आवर्जून येतात. या भेटीत सेवोनिया कॅसलची भेट हे त्यांचे सर्वात मोठे आकर्षण असते.

इतिहास सांगतो की १४७५ मध्ये रशिया आणि स्वीडन यांच्यातील युद्ध टाळण्यासाठी एरिक एक्स्लसन याने हा कॅसल बनविला होता. मात्र रशियाने या कॅसलचा ताबा घेतला आणि नंतर १८१२ साली तो फिनलंडला परत केला. सेवोंलिन्ना च्या चारी बाजूने सरोवरे आहेत व त्यामुळे या शहरातील सगळ्याच इमारती तरंगत आहेत असा भास होतो. देशातील सर्वात मोठी तसेच युरोपमधील चार नंबरची सरोवर सिस्टीम येथे आहे. शहराचे निसर्गसौंदर्य तर पाहणार्‍याच्या डोळ्यांना भरपेट मेजवानीच देत असते.

येथील सरोवर सिस्टीमचे वैशिष्ठ असे की कितीही पाऊस पडला आणि पूर आला तरी पाण्याची पातळी वाढत नाही. अगदीच वाईट परिस्थिती असेल तर पाण्याचा मार्ग बदलता येतो. येथे होणारा ऑपरा फेस्टीव्हल जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे आणि या देशाची सांस्कृतिक परंपरा व ऐतिहासिक महत्त्व हेही पर्यटकांच्या आकर्षणाचा एक भाग आहे.

Leave a Comment