
नवी दिल्ली- येत्या चार वर्षात ४० स्टोअर्स कपड्याची जगप्रसिद्ध कंपनी गॅप इनकॉर्पोरेशन भारतामध्ये उघडणार आहे. मागील आठवड्यात दिल्लीमध्ये गॅपने त्यांचे पहिले स्टोअर उघडले.
गॅप कंपनी पुढील चार वर्षात भारतात ४० शोरुम उघडणार
बंगळुरू, मुंबई आणि नवी दिल्लीमध्ये एकूण १० शोरुम या वर्षभरात उघडले जाणार आहेत असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक शोरुमसाठी ८-१० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागते. १९६९ साली गॅप ही कंपनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सुरू झाली. त्यानंतर या कंपनीने आपले विविध ब्रॅण्ड जगभरात विकले. गॅप, बनाना रिपब्लिक, ओल्ड नेव्ही, अॅथलिटा आणि इंटरमिक्स ही या कंपनीची प्रसिद्ध उत्पादने आहेत. पहिल्याच वर्षी भारतात ३००-४०० प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
