मारुतीची सेलेरिओ डिझेल कार बाजारात

maruti
नवी दिल्ली- बहुप्रतिक्षित मारुती सेलेरिओ डिझेल लाँच करण्यात आली आहे. ही कार प्रतीलीटर २७.६२ किमी धावेल असा कंपनीचा दावा आहे. या कारची किंमत ४.६५ लाख आहे.

या कारचे लाँचिंग केल्यानंतर लगेचच कंपनीच्या समभागांची विक्री वाढली. या कारचे डीडीआयएस १२५ इंजिन भारतातील डिझेल कारच्या कक्षा रुंदावेल असा विश्वास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक केनिची अयुकावा यांनी व्यक्त केला. डीडीआयएस इंजिन तयार करण्यासाठी कंपनीला सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक करावी लागली. सेलेरियोची पेट्रोल कार मागील वर्षी बाजारात आली होती. या कारला बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याप्रमाणेच डिझेल सेलेरिओलाही प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा अयुकावा यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment