व्हिडीओकॉनचा ‘व्हीए ८१ एम टॅबलेट’लाँच

videocon
मुंबई- व्हिडीओकॉन मोबाईल्स फोन्स डिव्हीजनने ‘व्हिडीओकॉन व्हीए ८१ एम टॅबलेट’ सादर केला आहे. अत्यंत आकर्षक डिझाईनचा टॅब ऍन्ड्रॉइड किटकॅट ४.४ वर चालतो. ७-इंची डब्ल्यूएसव्हीजीए स्क्रीनमुळे फोटोग्राफीचा उत्तम अनुभव मिळतो. त्यामुळे व्हिडीओ, ऑनलाईन कॉन्टेंट आणि गेम्स खेळायला मजा येते. ३००० एमएएच बॅटरी आणि ३-जी नेटवर्क कनेक्टीव्हीटीमुळे हा स्मार्टफोन ग्राहकांना वेगळा अनुभव देऊन जातो. १०८०एचडी व्हिडीओ, २ मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा आणि फ्रंट व्हीजीए कॅमेरा अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे व्हिडीओकॉन ‘व्हीए ८१ एम टॅबलेट’ अत्यंत आकर्षक हार्डवेअरने युक्त असा स्मार्टफोन झाला आहे. १.३ गिगाहर्ट्झ दुहेरी कोअर प्रोसेसर, ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी अंतर्गत स्टोरेज आणि त्याची ३२ जीबीपर्यंत विस्तारयोग्य क्षमता यांचा समावेश आहे.

‘व्हीए ८१ एम टॅबलेट’ला ५१२ एमबी रॅमचे पाठबळ असून अंतर्भूत नेट्वर्किंगची सुविधा करण्यात आली आहे. ‘व्हीए ८१ एम टॅबलेट’ वाय-फाय, दुहेरी सीम पाठबळ, व्हॉईस कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग, एजीपीएस नेव्हिगेशन, ब्ल्यूटूथने युक्त आहे. त्यामुळे तो या विभागातील सर्वोत्तम मनोरंजन करणारा स्मार्ट फोन ठरला आहे. ‘व्हीए 81एम टॅबलेट’ केवळ ४९०० रुपयांना उपलब्ध आहे. प्रवासादरम्यानची कनेक्टीव्हीटी अधिक जोमाने वाढत असून ‘व्हीए ८१ एम टॅबलेट’ दाखल करत मोबाईलवर सतत कार्यमग्न असलेल्या ग्राहकांवर आम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे. ग्राहकांच्या मोठ्या स्क्रीन आणि उत्तम वैशिष्ट्यांच्या गरजेला अनुसरून ‘व्हिडीओकॉन व्हीए ८१ एम टॅबलेट’ ग्राहकांना अविरत गेमिंग आणि मल्टीमिडिया अनुभव प्राप्त करून देतो. असे व्हिडीओकॉन मोबाईल फोन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जेरॉल्ड परेरा म्हणाले.