रिझर्व्ह बँक म्हणजे चिअर लिडर्स नाही- रघुराम राजन

rajan
सरकारी दबावामुळे रिझर्व्ह बँकेने कर्ज व्याजदरात कपात केल्याच्या आरोपाचे खंडन करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक केवळ प्रशस्ती करण्याचे काम करणारी चिअर लिडर्स नाही असे बजावले आहे. ते म्हणाले आमचे काम नागरिकांना मुद्रास्फिती संदर्भात रूपयाचे मूल्य भरवसा देणे आणि हा भरवसा कायम केल्यानंतर चांगले निर्णय घेण्यासाठी दीर्घकालीन आराखडा बनविणे हे आहे. सरकारला खूष ठेवण्यासाठी व्याजदर कपात करणे हे आमचे काम नाही.

राजन म्हणाले मिडीयामधून व्याजदर कमी केला की सरकारला खूष ठेवण्यासाठी निर्णय घेतल्याचा आरोप केला जातो तर व्याजदर कपातीला नकार दिला की आम्हाला सरकारविरोधात लढायचे आहे असे सांगितले जाते. तसेच स्वतःला मजबूत आणि शक्तीशाली बनविण्यासाठी रिझर्व्ह बँक कर्जाचे व्याजदर चढे ठेवते अशीही धारणा आहे. मात्र कोणताही निर्णय घेताना असावधानता असून चालत नाही. आकडेवारीवरूनच कपात अथवा व्याजदर वाढविण्याचे निर्णय घेतले जात असतात.