ह्युंदाईची एसयूव्ही क्रेटा या वर्षात भारतात

creta
दक्षिण कोरियातील कार मेकर कंपनी ह्युंदाईने भारतीय बाजारात स्पोर्टस युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) क्षेत्रात आपले पाय अधिक घट्ट करण्यासाठी नवी क्रेटा सादर करण्याची तयारी केली असून या सहामाहीत कोणत्याही क्षणी ही गाडी भारतीय बाजारात दाखल होईल असे समजते. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे वरीष्ठ उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) राकेश श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.

ह्युंदाईच्या भारतीय बाजारात सध्या सांताफे आणि आय टेन अॅक्टीव्ह या गाड्यांची विक्री केली जात आहे आणि त्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र पाच सीटर क्षमता असलेल्या क्रेटा मुळे कंपनी महिंद्रा, रेनाँ, निस्सान, फोर्ड, टाटा कंपनीशी स्पर्धा करू शकणार आहे. श्रीवास्तव म्हणाले की या गाडीचे डिझाईन आणि उत्पादन कोरियातच केले गेले आहे. मात्र ही कार भारतीय हवामान, रस्ते आणि ग्राहक गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यासाठी चेन्नई आणि हैद्राबाद येथील अभियंत्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

Leave a Comment