केएफसी विकते आठ पायाचे चिकन ?

kfc-china
चीनमधील तीन कंपन्यांविरोधात खोटी माहिती पसरविल्या प्रकरणी दीड कोटी रूपयांची नुकसान भरपाई दिली जावी तसेच कंपनीची माफी मागितली जावी यासाठी केएफसी फास्टफूड कंपनीने शंघाय येथील न्यायालयात केस दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केएफसी जेनेटीकल अॅन्डव्हान्स चिकनचा वापर पदार्थ तयार करण्यासाठी करते, त्यासाठी सहा पंख आणि आठ पाय असलेले चिकन वापरले जाते अशा अफवा आणि प्रचार सोशल मिडीयाच्या माध्यमातून केला जात आहे. मेसेजिंग अॅप व्हीचॅटवर अशा पोस्ट ४ हजार वेळा टाकल्या गेल्या आहेत. त्यासाठी शांगशी वेलकुआंग टेकनॉलॉजी, ताआन झिरो पॉईंट टेक्नॉलॉजी व चियांग चेनान्झी सक्सेस अॅड कल्चरल कम्युनिकेशन या कंपन्यांना जबाबदार धरले गेले आहे. या कंपन्यांही ही अफवा प्रथम पोस्ट केल्याचा कंपनीचा दावा आहे.

केएफसी चीन चे अध्यक्ष छू त्सुइरोंग या संदर्भात म्हणाले की आमच्या पदार्थांबाबत अशी खोटी माहिती व अफवा पसरविण्यामुळे ग्राहकांच्या मनात गोंधळ निर्माण होत आहे शिवाय आमच्या ब्रँडचे नुकसान होत आहे. यास्तव आम्ही या कंपन्यांविरोधात दावा दाखल केला आहे. कंपन्यांना पाठविलेल्या नोटिशीस अद्याप कोणीही उत्तर दिलेले नाही. २०१४ अखेर चीनमध्ये केएफसीच्या ४८२८ शाखा आहेत आणि दरवर्षी नवीन हजारो शाखा उघडल्या जात आहेत.

Leave a Comment