कूलपॅडचे स्मार्टफोन औरंगाबादेत बनणार

coolpad
औरंगाबाद – आता भारतात स्मार्टफोन निर्मितीतील चीनची आघाडीची कंपनी कूलपॅड विस्तार करणार आहे. बंगळूरु येथे संशोधन व विकास (आर अँड डी) प्रकल्प तर औरंगाबादेत हँडसेट जुळणी प्रकल्प उभारण्याची कूलपॅडची योजना आहे. भारतीय बाजारातील कोट्यवधींची संधी साधण्यासाठी कंपनी भारतात येत असल्याचे कूलपॅड इंडियाचे सीईओ वरुण शर्मा यांनी सांगितले. कूलपॅडने नुकतेच भारतात दोन स्मार्टफोन सादर केले आहेत.शर्मा यांनी सांगितले, भारतीय बाजारपेठेतील मोठ्या संधींचा लाभ घेण्यासाठी कूलपॅडने आता भारतावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीने दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत.

औरंगाबादेत हँडसेट जुळणी प्रकल्प टाकण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय बंगळुरू येथे कंपनीने संशोधन व विकास प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. त्यात उत्पादनाविषयी संशोधन होणार आहे. भारतीय बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन किफायतशीर किमतीतील स्मार्टफोन सादर करण्यावर कूलपॅडचा भर राहणार आहे.