चीनने बंद केली तिबेट सीमा

mansarovar
काठमांडू : चीनने भारताच्या पाठीत हिंदी-चीनी भाई भाई असा नारा देऊन पुन्हा एकदा खंजीर खुपसला असून चीनने तिबेटला लागून असलेल्या सर्व सीमा बंद केल्यामुळे तिबेटमध्ये असलेल्या कैलाश मानसरोवरच्या यात्रेला जाणाऱ्या भारतीय भाविकांना मोठा फटका बसणार आहे.

चीनने तिबेट सीमा नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर बंद केल्यामुळे नेपाळच्या मार्गे तिबेटमध्ये कैलास मानसरोवरच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांना त्यांच्या योजना बदलाव्या लागत आहेत. सुमारे २५,००० भाविकांना चीनच्या या निर्णयाचा फटका बसणार आहेत. या भाविकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे.

नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाने पराराष्ट्र मंत्र्यांना सांगितले की, हा मुद्दा चीनच्या अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहे. नेपाळच्या मार्गे २५,००० परदेशी पर्यटक कैलाश मानसरोवरला गेले तर त्याचा फायदा देशाला होईल.

Leave a Comment