राजेंद्रसिंह यांना पाण्याचे स्टॉकहोम वॉटर प्राईज हा पुरस्कार

rajendr-singh
नवी दिल्ली : प्रख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणजेच पाणीवाले बाबा यांना जलसंवर्धनासाठी त्यांनी केलेल्या अजोड कार्याची दखल घेऊन पाण्याचे नोबेल अशी ख्याती असलेल्या स्टॉकहोम वॉटर प्राईज हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी जलसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्या या कामाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबरच हा भारताचाही सन्मान आहे.

पाण्याच्या संकटावर कशा पद्धतीने मात करायची, याचे धडे देण्याबरोबरच वाळवंटातही पाण्याची मुबलक उपलब्धता करून पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लावावा, हे खरोखरच राजेंद्रसिंह यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. जलसंवर्धनाच्या या महत्त्वपूर्ण कार्यामुळेच जागतिक पातळीवर त्यांची दाखल घेतली असून, २६ ऑगस्ट रोजी स्वीडन येथे त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दीड लाख डॉलर आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जलसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणा-या महान व्यक्तीला स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट (सीव्ही) च्या वतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.