जगभरात भारतीय पुरूष घरकामात कामचुकार

indian
इकॉनॉमिक कोऑपरेशन अॅन्ड डेव्हलपमेंट कडे जमा झालेल्या आकडेवारीनुसार भारतीय पुरूष घरकामात जगातील अन्य देशांच्या तुलनेत अतिशय कामचुकार असल्याचे दिसून आले आहे. घरातील कामासाठी सर्वाधिक वेळ देणारया पुरूषांत स्लोव्हेनियातील पुरूषांचा पहिला क्रमांक आहे. ते दिवसाकाठी दोन तास घरकामासाठी देतात तर तर भारतातील पुरूष दिवसाकाठी फक्त १९ मिनिटे घरकामासाठी देतात. स्लोव्हेनियातील महिला दरदिवशी सरासरी साडेतीन तास घरकाम करतात तर भारतीय महिला मात्र दिवसाकाठी किमान ५ तास घरकाम करतात असेही ही आकडेवारी सांगते.

अन्य देशात डेन्मार्क मध्ये पुरूष आणि महिला यांच्यातील घरकामाचे प्रमाण अनुक्रमे पावणेदोन तास व अडीच तास, फ्रान्समध्ये पुरूष दीड तास महिला अडीच तास, ऑस्ट्रेलियात व जर्मनीत पुरूष दीड तास, महिला पावणेतीन तास, युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका मध्ये पुरूष दीड तास, महिला दोन तास , दक्षिण आफ्रिकेत पुरूष १ तास व बायका साडेतीन तास, ब्रिटनमध्ये पुरूष १ तास, महिला सव्वादोन तास, आयर्लंड मध्ये पुरूष पाऊणतास तर महिला सव्वादोन तास असे हे प्रमाण आहे. भारतीय पुरूष या यादीत शेवटून पहिले आहेत तर बायका या यादीत वरून पहिल्या क्रमांकावर आहेत.

Leave a Comment