
गुगल इंकने बंगलोर येथील मोबाईल जाहिरात कंपनी इनमोबी खरेदी करण्यासाठी बोलणी सुरू केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ही खरेदी झाली तर गुगलचे भारताच्या स्टार्टअप क्षेत्रातील हे पहिलेच डील ठरेल.2007 साली सुरू करण्यात आलेल्या इनमोबी चे 200 देशांत 1 अब्ज युजर्स आहेत असे समजते.
इंडियन स्टार्टअप इनमोबी गुगल खरेदी करणार
गुगल कॅपिटल हा गुगलच्या गुंतवणूुक विभाग भारतात थेट गुंतवणूकीसाठी प्रयत्नशील आहे. गुगलचे बंगलोर येथे शॉप आहे आणि ई कॉमर्स वा इंटरनेट क्षेत्रात त्यांची गुंतवणूक नाही जाहिरातीच्या माध्यमातून गुगलला फार मोठा महसूल मिळतो.त्यातही मोबाईल जाहिरातीचा वाटा मोठा आहे. त्यामुळेच इनमोबी खरेदीसाठी गुगल उत्सुक असल्याचे समजते. इनमोबीचे जपान सॉफटबँक, चायनाची अलिबाबा असे बडे क्लायंट आहेत. सध्या या खरेदीची प्राथमिक पातळीवरची बोलणी सूरू असल्याचेही सांगितले जात आहे.
गुगलने अॅडमोब ही अमेरिकन कंपनी 750 दशलक्ष डॉलर्सना खरेदी केली आहे. भारतात इंटरनेट युजरची संख्या प्रचंड वेगाने वाढती आहे आणि त्यातही इंटरनेट मोबाईलवर वापरणारे अधिक आहेत. यासाठी गुगल इनमोबी खरेदीस उत्सुक असून हे डील 1 अब्ज डॉलर्स पर्यंत केले जाईल असेही सांगितले जात आहे. 2014 अखेर भारतात इंटरनेट युजरची संख्या 24 कोटींवर होती.
