चीनचा भारतीयांसाठीही व्हिसा ऑन अरायव्हल?

visa
भारतीयांसाठीही चीन लवकरच व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा देणार असल्याचे वृत्त आहे. म्हणजेच भारतीय नागरिक बिजिंंग अथवा शांघायला पोहोचल्यानंतर व्हिसा घेऊ शकणार आहेत. सिंगापूर, ब्रुनेई आणि जपानी नागरिकांसाठी चीनने ही सुविधा अगोदरच उपलब्ध केली असून त्यानंतर भारताचा नंबर असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान मोदी मेच्या मध्यात बिजिंग दौर्यावर जाणार आहेत, त्या अगोदरच दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी हे पाऊल उचलले जाईल असे समजते. अर्थात यात अनेक अडचणी आहेत. भारत चीनमध्ये सीमावाद आहे. तसेच पुढकार कोणी घ्यायचा आणि सुरक्षा यंत्रणा व संरक्षण विभागाचा ताळमेळ कसा घालायचा हाही प्रश्न आहे. बिजिंग भारतीय दुतावासाकडून चीनी नागरिकांसाठी भारताने व्हिसा ऑन अरायव्हल साठी घातलेली सुरक्षा बंधने कमी करावीत अशी विनंती केली जात आहे. यामुळे चीनला भारतात गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळा होईल असेही सांगितले जात आहे. मात्र या दोन्ही देशांत अनेक क्षेत्रात असलेली स्पर्धा पाहता व्हिसा ऑन अरायव्हल प्रक्रिया टप्प्याटप्प्याने अमलात आणली जाईल असे तज्ञांचे मत आहे.

जेटली यांनी नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात व्हीसा ऑन अरायव्हल सुविधा 43 देशांवरून 150 देशांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. या यादीत चीनचा पहिला नंबर लागला तर चीनकडूनही तसाच प्रतिसाद मिळू शकेल. चीनने 2015 वर्ष व्हिजिट इंडिया इयर मोहिम सुरू केली असून भारत व्हिजिट चायना इयर 2016 मोहिम राबविणार आहे.

Leave a Comment