
यू ट्यूबवर खास बच्चे कंपनीसाठीचे अॅप लाँच केले असून गुगल ऑनलाईन व्हिडीओ सर्व्हिसवर २३ फेब्रुवारीपासून हे फ्री अॅप डाऊनलोड करता येणार आहे. स्मार्टफोन, टॅब्लेटमध्ये ते वापरता येणार आहे आणि यात खास बच्चे कंपनीसाठीचा कंटेट आहे.
यूट्यूबवर खास बच्चे कंपनीसाठी अॅप
या अॅपचे डिझाईन किडस फ्रेंडली आहे. यावरील आयकॉन मोठे आणि ठळक आहेत. स्क्रॉलिंगची गरज अगदी कमी आहे तसेच पालकांसाठी कंट्रोलरसह टायमरसारखी सुविधाही त्यात दिली गेली आहे. यामुळे मुलांनी कितीवेळ अॅपचा वापर करायचा हे पालक ठरवू शकणार आहेत. हे अॅप म्हणजे किड्स एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची सुरवातच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
