सोनीच्या स्मार्टफोनचे उत्पादन होणार बंद

sony
टोकियो : एक वाईट बातमी आहे ती सोनी कंपनीच्या स्मार्टफोनचे चाहते असणा-यांसाठी. कंपनीने आपल्या स्मार्टफोनचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला असून स्मार्टफोनच्या व्यवसायामधून कंपनीला अपेक्षित नफा मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.

स्मार्टफोनच्या क्षेत्रात आमच्या कंपनीची भविष्यात वाढ होताना दिसत नसल्याचे आम्ही काही कठोर निर्णय घेतले आहे, अशी माहिती सोनी कंपनीचे सीईओ काझू हीराई यांनी दिली. अनेक स्वस्त आणि ग्राहकांच्या सोयीच्या स्मार्टफोनची बाजारात चलती आहे. या वातावरणात सोनीचे महागडे स्मार्टफोन टिकाव धरू शकत नसल्यामुळे कंपनीने बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत स्मार्टफोनच्या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या क्षेत्रात आमची मक्तेदारी आहे, त्याच क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे, असे संकेत सोनी कंपनीचे सीईओ काझू हीराई यांनी दिले. प्ले स्टेशन आणि कॅमे-यांचे उत्पादन वाढवण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात विस्तार करून टीव्ही आणि स्मार्टफोन व्यवसायातील तोटा भरून काढण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सोनी कंपनी एक्सपिरिया या स्मार्टफोनचे युनिट बंद करण्याऐवजी दुस-या कंपनीला विकेल अथवा पार्टनरशिप करून उत्पादन सुरू ठेवेल, असा अंदाज बाजारपेठ तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment