गोठला जगातील सर्वांत मोठा धबधबा

naygara
टोरँटो : तीव्र थंडीमुळे अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर असलेला जगातील सर्वांत मोठा धबधबा नायगरा धबधबा गोठला आहे. येथे तापमान उणे १४ डिग्रीच्या खाली गेले आहे. जगातील सर्वांत मोठा असा नायगरा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात.अमेरिकेतील बहुतेक राज्य सध्या हिमवादळाच्या तडाख्यात अडकली आहे. पूर्व किना-यासह फ्लोरिडातील सर्व भाग तीव्र थंडीमुळे गोठले आहे. पश्चिम न्यूयॉर्कमध्ये थंड वारे शुक्रवारपर्यंत वाहतील, असा इशारा अमेरिकेच्या हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे वॉशिंग्टन डीसीमध्ये ४ ते ६ इंचापर्यंत हिमवर्षाव झाला. यामुळे शाळा आणि सरकारी कार्यालयांना सुट्या देण्यात आल्या आहेत.